मनमोहनसिंग, चिदंबरम यांनी संसदीय कामकाजातून घेतली सुट्टी

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम या ज्येष्ठ नेत्यांनी वैद्यकीय कारणास्तव संसदेच्या चालू अधिवेशनाच्या कामकाजातून सुट्टी घेतली आहे.
त्यांच्यासह एकूण 13 राज्यसभा सदस्यांनी आपल्याकडे वैद्यकीय सुट्टीचे अर्ज पाठवले आहेत, अशी माहिती अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात दिली.
मनमोहनसिंग, चिदंबरम यांच्याखेरीज अंबुमणी रामदास, ऑस्कर फर्नांडिस, परिमल नाथवानी, नरेंद्र जाधव, मानस रंजन भुनिया, सुशीलकुमार गुप्ता, व्ही. लक्ष्मीकांत राव, महेंद्र प्रसाद इत्यादी नेत्यांनीही नायडू यांच्याकडे रजेचा अर्ज पाठवून चालू अधिवेशनात अनुपस्थित राहण्याची अनुमती मागितली आहे. त्यानुसार नायडू यांनी त्या सर्वांची सुट्टी मंजूर केली आहे.
करोनाच्या वातावरणात हे अधिवेशन सुरू असून अनेक खासदार करोनाग्रस्त झाल्याच्या प्रकाराने अनेक ज्येष्ठ सदस्यांनी सध्या धास्ती घेतली आहे.





