रिल्स पाहता रिक्षा चालवली; व्हिडिओ शेअर करत मंजिरी ओकने व्यक्त केला संताप

Majiri Oak | अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने सोशल मीडियावर एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. मंजिरीने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे.
मंजिरीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन रिक्षाचालकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रिक्षा चालवताना रिक्षा चालक मोबाईलवर रील बघत असल्याचं दिसत आहे. त्याला तिने असे करु नको म्हणून बजावले असतानाही रिक्षा चालकाने तिचं ऐकलं नाही. शेवटी तिला रिक्षा बदलावी लागली. तिच्यासोबत घडलेला हा प्रसंग तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितला आहे.
View this post on Instagram
“पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन , असा प्रवास का करायचा ?आणि ह्यावर ह्यांना काही बोलायच नाही . कारण ह्यांचीच अरेरावी ऐकून घेयला लागेल. दोनदा सांगूनही काही सुधारणा न झाल्यामुळे मी रिक्षा बदलली आणि तरी ही त्याला काही फरक पडला नाही. म्हणजे भाडं गेलं तरी चालेल समोरच्याचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालीन पण मी रिक्षा चालवताना असा फोन बघणारच. पूर्ण वेळ हा असाच रिक्षा चालवतो असं अत्यंत अभिमानानी सांगितलं त्यांनी मला… एकूणच कठीण आहे सगळं देव त्याला अक्कल देवो,” असे मंजिरीने पोस्टमध्ये म्हंटले आहे.
मंजिरीच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी रिक्षावाल्यांची अरेरावी वाढत चालली असल्याचे म्हंटले आहे. तर काहींनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंगही सांगितला आहे.
हेही वाचा:
बांगलादेशचे नाव बदलणार? राष्ट्रपतींनाही हटवणार? वाचा नक्की काय घडतय





