मनिषा कोईरालाने शाहरुख खानचा घेतला खरपूस ‘समाचार’

Entertainment । अभिनेत्री मनीषा कोईरालाने सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांसारख्या बड्या स्टार्ससोबत अनेक मोठे हिट चित्रपट दिले आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या चित्रपटातून मनीषा कोईराला पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत परतली आहे.
तिने आपल्या कामाने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत. पण ‘दिल से’ या मणिरत्नमचा चित्रपटातील तिच्या पात्रासाठी ती आजही ओळखली जाते. नुकतेच हा चित्रपट रिलीज होऊन 26 वर्षे झाली आहे, पण आजही प्रेक्षकांना हा कल्ट क्लासिक आवडतो. शाहरुख खान आणि मनीषा कोईराला स्टारर ‘दिल से’ या चित्रपटाच्या कथेने सर्वांना खूप प्रभावित केले होते. मात्र अलीकडेच मनिषाने चित्रपटसृष्टीबाबत एक धक्कादायक विधान केले आहे.
मनिषा कोईरालाने अलीकडेच एक मुलाखतीत सांगितले की, ‘दिल से’ नंतर तिने शाहरुख खानसोबत ‘गुड्डू’ नावाच्या चित्रपटात काम केले होते, मात्र हा चित्रपट काही विशेष करू शकला नाही. मनीषाच्या म्हणण्यानुसार, या इंडस्ट्रीत नायक ठरवतो की त्याला कोणासोबत काम करायचे आहे, नायिका नाही. दिग्गज अभिनेत्रीचा हा इशारा शाहरुख खानकडे होता असे मानले जाते.
शाहरुख खानसोबत काम का केले नाही? यावर मनीषा म्हणाली, ‘या प्रश्नाचे अचूक उत्तर माझ्याकडे नाही, मात्र हे शाहरुख खानलाच विचारावे लागेल, असे अभिनेत्रीने तिच्या उत्तरात म्हटले आहे. तिने असे म्हणत शाहरुखचा खरपूस समाचार घेतला.
शानदार कथा आणि शाहरुख-मनिषा सारखी उत्तम स्टारकास्ट असूनही ‘दिल से’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. आपल्या जुन्या मुलाखतीदरम्यान दिग्दर्शक मणिरत्नम यांनी यासाठी हिंदी कौशल्याला जबाबदार धरले होते. एका रिपोर्टनुसार हा चित्रपट बनवण्यासाठी 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.’





