Manipur drone attack । मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसून येत नाहीत. मागच्या वर्षभरापासून राज्यात तणावाचे वातावरण आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यूही झाला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही तैनात करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा याठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर येतायेत. माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला Manipur drone attack । आता मणिपूरमधील बिष्णुपूर जिल्ह्यात मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. यासंदर्भातीलवृत्त इंग्रजी वर्तमानपत्राने दिलंय. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मारेम्बम कोईरेंग यांच्या घरावर कुकी अतिरेक्यांनी रॉकेट बॉम्बने हल्ला केला. या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले असल्याची माहिती सांगितली जात आहे. काँग्रेस नेते मारेम्बम कोईरेंग हे मणिपूरचे पहिले मुख्यमंत्री होते. हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं? Manipur drone attack । माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला झाला त्यावेळी जे घडलं ते एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. रॉकेट घराच्या भिंतीवर आदळले आणि लगेचच त्याचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, कुकी-झोमी बहुसंख्य चुराचंदपूर जिल्ह्यात उंच स्थानांवरून ट्रोंगलाओबीच्या सखल निवासी भागाकडे अशा प्रकारचे रॉकेट डागण्यात आले. दरम्यान, मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारने ७ सप्टेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत शुक्रवारी शिक्षण मंत्रालयाने एक आदेश जारी केला असून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि केंद्रीय शाळा ७ सप्टेंबर रोजी बंद राहतील असं आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, ड्रोन आणि आता रॉकेटच्या हल्ल्यांनंतर मणिपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.