अखेर रेल्वेच्या नकाशावर जोडले गेले मणीपूर…

भारतीय रेल्वेच्या संपुर्ण देशातील रेल्वे नेटवर्कच्या जाळ्यामध्ये अखेर मणीपूर हे रेल्वे स्टेशन अखेर जोडले गेले आहे. आसामच्या सीलचर येथून सुटलेली राजधानी एक्सप्रेस अखेर मणीपूर येथे दाखल झाली. मणीपूरमध्ये पहिल्यांदाच दाखल झालेली ही ट्रेन होती.
प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रेनसाठी ११ किलोमीटरचा मार्ग पुर्ण करण्यात आला होता. नागालॅंडच्या तामेलॉंग जिल्ह्यात वंगाईचुंगपाओ या स्टेशनला ही ट्रेन दाखल झाली. त्यानंतर पुढे सिलचर रेल्वे स्टेशन येथे भारतीय झेंडा फडकवत राष्ट्रगीतही गाण्यात आले. लवकरच ही सेवा रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वेने केलेल्या तयारीनुसार इम्फाळ येथे पोहचण्याचे रेल्वेचे उदिष्ट आहे. त्यासोबतच मणीपूरची सीमा असलेल्या मोरेह येथेही एक शेवटचे स्टेशन उभारण्याचा रेल्वेचा मानस आहे. आतापर्यंत अनेकदा दरडी कोसळल्यामुळे आणि नैसर्गिक संकटांमुळे या टप्प्याचे काम ठप्प झाले होते. त्यामध्येच देशव्यापी लॉकडाऊन तसेच बंदसारख्या घटनांमुळेही काम अनेकदा थांबले. तसेच कर्मचाऱ्यांचेही अपहरणाचे प्रकार घडले आहेत. जगभरातील सर्वात उंच असा रेल्वे ब्रीज हा येत्या दिवसांमध्ये सिलचर आणि इम्फाळ दरम्यान पूर्ण होणार आहे.
ईशान्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी न्रिपेन भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ब्रॉडगेज रेल्वे सेवा ही वंगाईचुंगपाओ या स्टेशनपर्यंत विस्तारीत करण्यात आली आहे. त्यामुळेच लवकरच वंगाईचुंगपाओ ते सिलचर दरम्यान रेल्वे सेवा सुरू होणार आहे. या रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे मणीपूरच्या नागरिकांचा खूपच सुविधा होणार आहे. या रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे देशातील इतर राज्यातही पोहचणे शक्य होईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.




