माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव; 2 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेविरोधात कोर्टात दाद मागणार

Manikrao Kokate | कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे.
या शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटे हे आज सत्र न्यायालयात धाव घेणार आहेत. कोकाटे आज सत्र न्यायालयात अपील दाखल करणार असून दुपारी 3:00 नंतर यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या.
यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी (दि. 20) या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. Manikrao Kokate |
या प्रकरणानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. यादरम्यान शिक्षेला आव्हान देण्यासाठी कोकाटे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सुनावणीदरम्यान काय निकाल दिला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Manikrao Kokate |
हेही वाचा:





