माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा! आमदारकी कायम राहणार…

Manikrao Kokate | शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने माजी क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, त्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवले जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीसद्वारे जारी केले आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे दोषी ठरले होते. या प्रकरणात त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोकाटेंच्या अटकेला स्थगिती दिली होती, मात्र शिक्षा कायम ठेवली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना मोठा दिलासा दिला. Manikrao Kokate |
Supreme Court stays the conviction of former Maharashtra minister and senior Nationalist Congress Party (NCP) Manikrao Kokate in the 1995 cheating and forgery case linked to a government housing scheme.
The Supreme Court also issued a notice to the Maharashtra government on the… pic.twitter.com/90UntOPkHX
— ANI (@ANI) December 22, 2025
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नेमकं प्रकरण काय?
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळवण्यासाठी कमी उत्पन्न आणि घर नसल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण १९९५-९७ चे आहे. याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती. फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रथम न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली, जी सत्र न्यायालयाने कायम ठेवली. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आता सर्वोच्च न्यायालय कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. Manikrao Kokate |
हेही वाचा:
फुकुशिमा दुर्घटनेनंतर जपान जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा सुरू करणार





