पुणे जिल्हा | चिंबळी परिसरात आंब्याची झाडे बहरली
Updated On:

चिंबळी,(वार्ताहर)– खेड तालुक्यातील दक्षिण भागातील आंबा बागांमध्ये डिसेंबर ते जानेवारीत आंब्याला मोहोर येण्यास प्रारंभ होतो. दोन वर्षांत पावसाचा अनियमितपणा, गारपीट, वादळी वारे यामुळे मोहोराचे प्रमाण कमी होते.
याचा व्यापारी व शेतकर्यांना फटका बसला होता. यंदा पावसाचे प्रमाण कमीजास्त राहिले आहे. त्यातच बदलत्या वातावरणामुळे आलेला मोहोर गळण्यास सुरुवात झाली होती; मात्र शेतकर्यांनी वेळोवेळी काळजी घेतल्याने सध्या तरी आंब्याची झाडे मोहोर भरल्याने शेती शिवार फुलले आहे.


