Maharashtra Election : देवेंद्र फडणवीस नव्हे तर महिला नेत्याला मुख्यमंत्री करा; ‘या’ नेत्याने केली मागणी

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष नवीन मंत्रीमंडळाकडे लागले आहे. महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार? मंत्रिमंडळात कुणा- कुणाचा समावेश असणार? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार? याकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची नावे चर्चेत असताना ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या नेत्याने महिला मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे.
पंकजा मुंडेना मुख्यमंत्री करा
ओबीसी आरक्षण बचाव समितीचे नेते मंगेश ससाणे यांनी ही मागणी केली आहे. ओबीसींना विरोध करणारा मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. मनोज जरांगे पाटीलचा खुटा ओबीसीने उपटला आहे.महायुतीसाठी ओबीसी समाज निर्णायक ठरला आहे. ओबीसी समाज्याला मुख्यमंत्री पद द्यावं, असं ससाणे यांनी म्हटलं. छगन भुजबळ किंवा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री कराव अशी आम्ही मागणी करतोय महायुतीने याचा विचार करावा अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला फटका बसेल.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत राज्यात सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे. लवकरच महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. यावेळी 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. यात भाजपचे 10, शिवसेना शिंदे गटाचे सहा तर अजित पवार गटाचे चार आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.





