पुणे जिल्हा | पिंपळी-लिमटेकच्या उपसरपंचपदी मंगल खिलारे

बारामती, (प्रतिनिधी) – पिंपळी-लिमटेक येथील उपसरपंचपदी मंगल खंडू खिलारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच अश्विनी सुनील बनसोडे यांनी पिंपळी गावच्या महाविकास आघाडी पार्टी अंतर्गत ठरविण्यात आलेला उपसरपंचपदाचा कालावधी पूर्ण होताच राजीनामा दिला होता.
पॅनल प्रमुख रमेश ढवाण पाटील व संतोष ढवाण पाटील, आबासाहेब देवकाते पाटील, अशोक ढवाण पाटील तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांचे उपस्थितीत उपसरपंच निवडीबाबत बैठक झाली. त्यामध्ये सर्वांच्या वतीने मंगल खिलारे यांचे नाव जाहीर केले. पिंपळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मंगल केसकर यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब भोईटे यांच्या निदर्शनाखाली उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली.
विरोधी गटाच्या वतीने उपसरपंचपदासाठी अर्ज न आल्याने खिलारे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी केली. याप्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच मंगल खिलारे यांनी सर्व निवडकर्त्यांचे आभार मानून सर्वांना सोबत घेऊन काम करू, अशी ग्वाही दिली. मावळत्या उपसरपंच अश्विनी बनसोडे यांनी देखील त्यांना पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब देवकाते पाटील ग्रामपंचायत सदस्या स्वाती ढवाण पाटील, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे उपाध्यक्ष सुनील बनसोडे, अशोक ढवाण पाटील, महेश चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मावळते उपसरपंच अश्विनी बनसोडे व नवनिर्वाचित उपसरपंच मंगल खिलारे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी छत्रपतीचे संचालक संतोष ढवाण पाटील, सरपंच मंगल केसकर, उपसरपंच अश्विनी बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब देवकाते, राहुल बनकर, अजित थोरात,
ग्रामपंचायत सदस्या स्वाती ढवाण पाटील, कोमल टेंबरे, निवडणूक निर्णय तथा ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे आदींसह महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे उपाध्यक्ष सुनील बनसोडे, बारामती खरेदी-विक्री संघाचे माजी व्हाइस चेअरमन भाऊसाहेब भिसे,
पोलीस पाटील मोहनराव बनकर, अशोकराव ढवाण पाटील, महेश चौधरी, हरिभाऊ केसकर, लालासो टेंबरे, आनंद निंबाळकर, अनिल बनकर, बाळासाहेब बनसोडे, प्रसन्ना थोरात, महादेव खोमणे, सतीश शिंदे, बबलू खंडाळे, ग्रामस्थ उपस्थित होते.





