पुण्यानंतर कोल्हापुर हादरलं! दोन वर्षे लैंगिक शोषण करत दोनदा घडवला गर्भपात
Updated On:

कोल्हापूर – पुण्याची अत्याचारी घटना ताजी असताना आज कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून सलग दोन वर्षे एका महिलेचे लैंगिक शोषण केल्या प्रकार उघडकीस आला आहे.
मारुती तातोबा तेऊरवाडकर, वय 14 असे आरोपीचे नाव असून तो कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदवड तालुक्यातील कालकुंद्री येथील रहिवासी आहे. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर नेसरी पोलिसांना संशयित आरोपीस अटक केली आहे.
मारुती ने केवळ हार घालून लग्न केल्याचे नाटक करत पीडित महिलेची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. ऑक्टोबर 2019 ते 28 जुलै 2021 पर्यंत पीडित महिलेचे लैंगिक शोषण केले असून दोनवेळा गर्भपात केला आहे. याशिवाय आर्थिक फसवणूक, मारहाण केल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.





