मथुरा – उत्तर प्रदेशातील मथुरा येथे मंगळवारी पहाटे 10 किमीपेक्षा जास्त अंतरावर कारखाली एक मृतदेह ओढून नेण्यात आल्याची घटना घडली आहे. दिल्लीमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका तरुणीचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. मथुरेतील घटनेत आधीच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचा मृतदेह दुसऱ्या वाहनाखाली अडकला आणि किमान 10 किमी फरफटत गेला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हिट-अँड-ड्रॅगच्या ताज्या प्रकरणात, मृतदेह कारच्या अंडर कॅरेजमध्ये अडकला गेला आणि 10 किमीपेक्षा जास्त ओढला गेला. ही कार चालवणारा दिल्लीचा रहिवासी वीरेंद्र सिंग याला अटक करण्यात आली आहे. तो दावा करतो की, त्याच्या कारखाली अडकलेला तो माणूस एका वेगळ्या अपघातात मारला गेला आणि त्याच्या गाडीखाली सापडला गेला. मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नाही. वीरेंद्र सिंग पहाटे 4 च्या सुमारास आग्रा ते नोएडाला जात असताना यमुना एक्स्प्रेस वेवर मथुरा शहराजवळील टोल बूथवर त्यांच्या कारखाली अडकलेल्या मृतदेहाने सुरक्षा कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले. टोल कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी गाडी थांबवली होती त्या ठिकाणी कारखाली एक छिन्नविछिन्न मृतदेह दिसला. सिंग याने सांगितले की, सोमवारी रात्री दाट धुक्यात काहीही दिसत नव्हते आणि त्याच्या गाडीखाली मृतदेह असल्याचे कधीच कळले नाही. https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/agniveer-is-the-idea-of-rashtriya-swayamsevak-sangh-rahul-gandhi/ 1 जानेवारीच्या पहाटे, 20 वर्षीय अंजली सिंग दिल्लीत स्कूटरवरून जात असताना एका कारने तिला धडक दिली आणि 13 किमी खेचली गेली. गाडीत असलेल्यांनी तिचे किंचाळणे ऐकले होते, पण ते थांबले नाहीत.