ममता कुलकर्णींने दिला महामंडलेश्वर पदाचा राजीनामा; 4 मिनिटांच्या व्हिडीओत सर्वकाही सांगितलं…

Mamta Kulkarni : माजी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी सोमवारी एक मोठी घोषणा केली. त्यांनी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून त्यांनी ही माहिती दिली आणि आपण लहानपणापासून साध्वी आहोत आणि यापुढेही साध्वी राहणार असल्याचे ममता कुलकर्णी यांनी म्हंटले आहे.
#WATCH | Prayagraj | Mamta Kulkarni says, “I am resigning from the post of Mahamandaleshwar of Kinnar Akhada. I have been ‘sadhvi’ since my childhood and I’ll continue to be so…”
(Source – Mamta Kulkarni) pic.twitter.com/iQAmmBkjVR
— ANI (@ANI) February 10, 2025
यमाई ममता नंद गिरी म्हणजेच त्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा देत असल्याचं ममता कुलकर्णी यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. आज किन्नर आखाडा किंवा दोन्ही आखाड्यांमध्ये त्यांना महामंडलेश्वर घोषित करण्यावरून झालेल्या वादामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ममता 25 वर्षे साध्वी होती आणि भविष्यातही साध्वीच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ममता कुलकर्णी म्हणाल्या की, आपल्याला महामंडलेश्वराचा मान देण्यात आला होता, मात्र काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला, त्यामुळे या पदाचा राजीनामा देत आहे.
नेमकं काय म्हणाल्या ममता कुलकर्णी व्हिडीओ पहा –