ममतांचा केंद्रावर निशाणा ; म्हणाल्या,’बांगलादेशी घुसखोरांना का तेंव्हाच थांबवले नाही?’

Mamata Banerjee on Modi government । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कोलकात्यातील नेताजी इंडोर स्टेडियममध्ये वक्फ (संशोधन) अधिनियम 2025 वर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत इमामांना संबोधित केले. यावेळी त्यांनी वक्फ कायद्याच्या विरोधात राज्यात झालेल्या हिंसाचारावर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजप बंगालची बदनामीकरत असल्याचा आरोप केला. त्यांनी यूपी आणि बिहारमधील व्हिडिओ दाखवून खोट्या बातम्यांद्वारे बंगालला बदनाम केले जात असल्याचा दावा केला. भारतीय जनता पक्षावर (भाजप) बनावट व्हिडिओ प्रसारित करून बदनामीचे षड्यंत्र रचल्याचा आरोप केला.
…तर त्यावेळी तुम्ही त्यांना सीमेवर का रोखले नाही ? Mamata Banerjee on Modi government ।
ममता बॅनर्जी यांनी इमामांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि सर्व धर्मगुरूंचा आदर करत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “मी हात जोडून विनंती करते की शांतता राखा. बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारसरणीला मानणारी संस्कृती आहे. भाजपच्या हिंसाचार भडकवण्याच्या कटाला बळी पडू नका.” त्यांनी सीमा सुरक्षेची जबाबदारी बीएसएफची असल्याचे नमूद करत बंगालला बदनाम करण्यासाठी बनावट मीडिया अहवाल वापरले जात असल्याचा दावा केला.तसेच जर बांगलादेशातून येऊन लोक इथे हिंसाचार करत होते तर त्यावेळी तुम्ही त्यांना सीमेवर का रोखले नाही ? असा थेट सवाल त्यांनी यावेळी केंद्राला केला.
#WATCH | Kolkata: West Bengal CM Mamata Banerjee says, “We believe in Sarva Dharma Samabhava. I believe in Ramakrishna Paramahamsa, Swami Vivekananda… I request you to control if someone wants to create unrest in Bengal by getting agitated by BJP’s statement…” pic.twitter.com/vOlmC2CkSJ
— ANI (@ANI) April 16, 2025
केंद्राने हा कायदा मंजूर करण्याची घाई केली Mamata Banerjee on Modi government ।
वक्फ कायद्याबाबत केंद्र सरकारवर टीका करताना ममता यांनी प्रश्न उपस्थित केला की, केंद्राने हा कायदा मंजूर करण्याची इतकी घाई का केली? त्यांना बांगलादेशातील परिस्थितीची जाणीव नाही का? त्यांनी मोहम्मद युनूस यांच्याशी गुप्त बैठक घेतल्याचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या हेतूंवर शंका व्यक्त केली.
यावेळी ममता यांनी स्पष्ट केले की, वक्फ कायदा केंद्र सरकारने बनवला असून, त्याची अंमलबजावणी पश्चिम बंगालमध्ये होणार नाही. त्यांनी लोकांना केंद्र सरकारकडून उत्तर मागण्याचे आवाहन केले आणि हिंसाचार टाळण्यासाठी संयम राखण्याची विनंती केली





