Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का ! ईडीने 440 कोटींच्या बँक ठेवी गोठविल्या
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे. कोलकात्यातील टीएमसीची ४४० कोटी रुपये जमा असलेली तीन बँक खाती ईडीने गोठवण्याचे आदेश देत मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत बुधवारी ही कारवाई केली.

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये (Mamata Banerjee) मोठी फूट पडली आहे. यानंतर काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) तीन बँक खात्यांमधील ४४० कोटी रुपयांच्या व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आता या प्रकरणात ईडीने तृणमूल काँग्रेसची ४४० कोटी रुपये जमा असलेली 3 बँक खाती गोठवली आहेत.
यामुळे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे. कोलकात्यातील टीएमसीची ४४० कोटी रुपये जमा असलेली तीन बँक खाती ईडीने गोठवण्याचे आदेश देत मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत बुधवारी ही कारवाई केली. यासंदर्भात एका सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम टीएमसीच्या काही बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप करणारी तक्रार जूनमध्ये दाखल झाली होती.
त्यानंतर त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. आता या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली असून ईडीने पीएमएलए अंतर्गत तपासात सामील होण्यापूर्वी तीन पक्षांच्या खात्यांमधील व्यवहार गोठवले आहेत. तपास अधिकारी १८ टीएमसीच्या बँक खात्यांची आणि विविध कंपन्यांशी संबंधित व्यवहारांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
दरम्यान, या संबंधित घडामोडीत ज्या खासगी बँकेत टीएमसीची ही खाती आहेत, त्या बँकेने (Mamata Banerjee) कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या खात्यांमधील रकमेचा तपशील देणारा अहवाल सादर केला. हा अहवाल अद्याप न्यायालयाने उघडला नसून या प्रकरणाची सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आली.






