Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडली साथ
पश्चिम बंगालचे माजी मंत्री रविंद्रनाथ घोष यांच्या रूपाने आणखी एका ज्येष्ठ नेत्याने तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची साथ सोडली. घोष आता तृणमूलच्या बंडखोर गटाचे भाग बनले आहेत.

Mamata Banerjee : पश्चिम बंगालचे माजी मंत्री रविंद्रनाथ घोष यांच्या रूपाने आणखी एका ज्येष्ठ नेत्याने तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची साथ सोडली. घोष आता तृणमूलच्या बंडखोर गटाचे भाग बनले आहेत.
बंगालची सत्ता गमावल्यानंतर तृणमूलमध्ये आमदार आणि खासदारांच्या स्तरांवर दुहेरी फूट पडली. त्यानंतर बंडखोर आमदारांच्या गटाने पक्षावर ताबा मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
त्या गटाने संघटनात्मक पातळीवर (Mamata Banerjee) समांतर यंत्रणा उभारण्याची प्रक्रियाही हाती घेतली आहे. त्याचा भाग म्हणून पक्षाच्या राज्य आणि जिल्हा समित्यांमध्ये पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे.
अशात घोष यांनी बंडखोर गटाशी हातमिळवणी करण्याची घडामोड घडली आहे. त्यांना बंडखोर गटाचे कूचबिहार जिल्हाध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, घोष यांनी तृणमूलच्या पराभवाचे खापर ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि पक्षाच्या प्रचार मोहिमेची जबाबदारी सांभाळणाऱ्या आय-पॅक या संस्थेवर फोडले.
ममतांनी सक्रिय राजकारणातून अभिषेक (Mamata Banerjee) यांना दूर करावे. तसे झाल्यास बंडखोर गट पुन्हा ममतांकडे परतेल, असा दावा त्यांनी केला. बहुतांश तरूणांचा समावेश असणाऱ्या आय-पॅकच्या क्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.






