Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का! पक्षाच्या बँक खात्यामधील रक्कम गोठवली
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनजी (Mamata Banerjee) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनजी (Mamata Banerjee) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या तीन बँक खात्यांवरील व्यवहारांवर पोलिसांनी निर्बंध लावले असून, आता या तिन्ही खात्यांमधील सुमारे 440 कोटी रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते अरूप बिस्वास यांनी काही दिवसांपूर्वी संबंधित खासगी बँकेला पत्र पाठवून टीएमसची (Mamata Banerjee) ही खाती गोठवण्याची विनंती केली होती.
याशिवाय पक्षातील बंडखोर गटाशी संबंधित सुमारे दहा आमदारांनीही या प्रकरणी बिधाननगर पोलिस आयुक्तालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संबंधित खात्यांवरील डेबिट व्यवहारांवर बंदी घातली.
अरूप विश्वास यांनी बँकेला पत्र लिहिले होते की, ते पक्षाचे अधिकृत खजिनदार होते. मात्र, 5 जून रोजी झालेल्या संघटनात्मक फेरबदलामध्ये त्यांच्या जागी माजी राज्यसभा सदस्य शुभाशीष चक्रवर्ती यांची (Mamata Banerjee) पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली. तथापि, बँकिंग प्रक्रियेतील आवश्यक औपचारिकता अद्याप पूर्ण न झाल्याने शुभाशीष चक्रवर्ती यांची अधिकृत स्वाक्षरीकर्ते म्हणून नोंद झालेली नाही.
त्यामुळे बँकेच्या नोंदींमध्ये अरूप विश्वास यांचेच नाव अद्याप अधिकृत खजिनदार म्हणून कायम आहे. दरम्यान, सध्या तृणमूल काँग्रेसमध्ये (Mamata Banerjee) खरी तृणमूल काँग्रेस कोणाची, यावरून वाद सुरू आहे. पक्षाविरोधात बंड पुकारलेल्या काही खासदारांनी आधीच स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली आहे. तर अनेक नाराज आमदार स्वतःलाच मूळ तृणमूल काँग्रेसचे खरे प्रतिनिधी असल्याचा दावा करत आहेत.






