Sanjay Raut : काल 1 मे पासून एलपीजी (LPG ) सिलिंडर महागला आहे. घरगुती गॅससह व्यावसायिक गॅसमध्ये नवीन दरवाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना याची मोठी झळ आगामी काळात सोसावी लागणार आहे. तसेच येणाऱ्या काळात आणखी दर वाढ होणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. (Sanjay Raut) येत्या 4 मे रोजी देशातीच पाच राज्याच्या विधानसभेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या पाचही राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मतदान झाले. मतदान झाल्यानंतर लगलेच एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्याही दरात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. या दरवाढीमागे इराण-अमेरिका-इस्राइल संघर्ष असल्याचे कारण समोर येत आहे. केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरच्या नवीन दरवाढीनंतर आता उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावर संजय राऊतांनी भाष्य करताना जिथे जिथे पेट्रोल डिझेलची गरज असेल ते सर्व प्रवास महाग होणार असल्याचे अंदाज वर्तवला आहे. मोदींजी म्हणतात सबकुछ ठीक है पण सगळं ठीक नाही, पश्चिम बंगालच्या निवडणुका होईपर्यंत सबकुछ ठीक असतं, आता यापुढे नाही. असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. 4 मे रोजी पाच राज्यातील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्ता जाऊन कमळ फुलणार असल्याचा अंदाज काही एक्सिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. संजय राऊतांचा मोठा दावा (Sanjay Raut) Sanjay Raut : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममताराज? राऊतांनी थेट जागांचा आकडाच सांगितला मात्र, संजय राऊतांनी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बनर्जी यांच्याच पक्षाची सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी ममता यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला किती जागा मिळतील याचा थेट आकडाच सांगितला. ममता बनर्जी या 180 ते 185 विधानसभा जागा जिंकून पुन्हा सत्तेत येतील, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे. शाहांना टोला (Sanjay Raut) पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी अमित शाहांना आत्मविश्वास कोणताही असू शकतो. आत्मविश्वासाला कुलूप लावलेले नाही, फसफसणारा आत्मविश्वास आहे. खोटेपणाचा कळस गाठल्यानंतर माणसाचा आत्मविश्वास वाढतो, असा खोचक टोला लगावला. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं आहे, मी घेतलेल्या माहितीनुसार त्यांचा विजय व्हायला हरकत नाही, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. हेही वाचा : West Bengal Election 2026 : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ‘या’ १५ बूथवर पुन्हा मतदान घेण्यास सुरुवात, नेमकं काय घडलं?