“ममतांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी” – अधिररंजन चौधरी
Updated On:

कोलकाता – ममता बॅनर्जी यांनी बेहरामपुर लोकसभा मतदार संघातून आपल्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान या मतदार संघातील कॉंग्रेस खासदार अधिररंजन चौधरी यांनी दिले आहे.
जर त्यांना शक्य नसेल तर त्यांनी आपले भाचे अभिषेक बॅनर्जी यांना आपल्या मतदार संघातून उमेदवारी द्यावी, त्यांनी त्यांच्या प्रचारासाठी सर्व सरकारीयंत्रणा लावाव्यात, मी मात्र केवळ लोकांचा पाठिंबा घेऊन निवडणूक लढवीन बघुया कोण जिंकते असे आव्हान त्यांनी दिले.
कालच ममतांनी बंगाल मधील सर्व ४२ मतदार संघातील आपले उमेदवार जाहीर केले. त्यांची ही कृती भाजपला अनुकुूल अशीच आहे. त्या कधीही मोदींना आव्हान देऊ शकत नाहीत असेही त्यांनी नमूद केले.
त्यांचे उद्दीष्ठ केवळ अधिररंजन चौधरी यांना पराभूत करणे हे आहे. मग त्यासाठी भाजपला विजय मिळाला तरी त्यांना चालणार आहे असेही चौधरी यांनी नमूद केले.





