मालवण पुतळा प्रकरण: दोषींवर कारवाई करावी; आमदार चेतन तुपे यांची मागणी

हडपसर : छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बनविताना केलेल्या चुकांना माफी न देता दोषींवर कडक कारवाई करावी ,अशी मागणी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी केली तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी सुरुवातीपासून काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळील छत्रपतींचा पुतळा पडल्याप्रकरणी शनिवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. हडपसर विधानसभा मतदारसंघातील ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे मूक आंदोलन करण्यात आले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादनही करण्यात आले.
यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे पाटील, मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, कार्याध्यक्ष संदीप बधे , अमर तुपे ,समीर शेख, वैष्णवी सातव, माजी नगरसेवक फारूख इनामदार,मनोज घुले, रोहिणी क्षीरसागर, इंद्रसेन काकडे, जितीन कांबळे,विनोद संकट,अजिनाथ भोईटे,मोहन मोरे, राजेंद्र घुले,अनूप घुले, विठ्ठल विचारे,सागरराजे भोसले, राजेंद्र घुले,दिपाली झेंडे, ऋषिकेश म्हस्के, बिना कटिमणी,यांच्यासह हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





