Malshej Ghat Landslide : माळशेज घाटात दरड कोसळून दोन जण ठार

Malshej Ghat Landslide – महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाट येथे मुसळधार पावसामुळे दरड एका रिक्षावर पडल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन जण ठार झाले तर एक महिला जखमी झाली. कल्याण-अहमदनगर महामार्गावर मंगळवारी सायंकाळी ही घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
टोकावडे पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनकर चकोर यांनी सांगितले की, एका कुटुंबातील जण मुंबईच्या शेजारील मुलुंड येथून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला ऑटो-रिक्षातून प्रवास करत होते.
त्यावेळी माळशेज घाटात एक मोठा दगड या रिक्षावर पडला. त्यात राहुल बबन भालेराव (३०) आणि त्याचा पुतण्या स्वयं सचिन भालेराव (७) हे दोन जण जागीच ठार झाले. तर एक ५५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली.
खबर मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आली. या प्रकरणी ओतूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ही घटना मुरबाड येथील टोकावडे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.





