“कॉंग्रेस रोजगार क्रांतीची..” मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्टचं सांगितलं

नवी दिल्ली – काँग्रेस रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी, उद्योजकता सक्षम करण्यासाठी आणि तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलून ‘रोजगार क्रांती’ची सुरुवात करेल, असे कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.
तरुणांचे भविष्य अंधकारमयातून उज्वल होईल याची काँग्रेस हमी देते. युवा न्याय मध्ये कॉंग्रेसने आपल्या हमींचा पुनरूच्चार केला आहे असे त्यांनी नमूद केले आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये ते म्हणाले, “काँग्रेस पक्ष युवा न्याय हमीद्वारे देशात ‘रोजगार क्रांती’ सुरू करेल! आम्ही रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी, उद्योजकता सक्षम करण्यासाठी आणि आमच्या स्वप्नांना आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ठोस उपाययोजना करू.
केंद्र सरकार पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ३० लाख रिक्त जागांवर भरती करून रोजगार पुरवण्याच्या कामाला प्रारंभ करेल. ‘पहेली नौकरी पक्की’ योजनेचा एक भाग म्हणून, पक्ष सर्व शिक्षित तरुणांना शिकाऊ ॲपरेंटिस साठी वर्षाला एक लाख रुपये देईल, असे खर्गे यांनी नमूद केले.





