‘धार्मिक कार्ड’ फेल ! मलेशियाने पाकला दाखवला आरसा ; भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा

Malaysia with India। आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला पुन्हा एकदा तोंडावर पडण्याची वेळ आली आहे. कारण मलेशियाने पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. मलेशियाने पाकिस्तानच्या भारताविरुद्धचे ‘धर्म कार्ड’ (religion-card) ला पूर्णपणे नाकारले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, भारताने दहशतवादावर संपूर्ण जगासमोर पाकिस्तानला उघड केले आहे. भारताचे सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ देखील वेगवेगळ्या देशांना भेट देत आहेत आणि दहशतवादाबद्दल पाकिस्तानच्या दुटप्पी मापदंडांना उघड करत आहेत.
दरम्यान, शेजारील देश आपल्या कुकर्मापासून काही केल्या थांबत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार स्वतःचा अपमान थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता पाकिस्तानने मलेशियामध्ये धार्मिक कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच भारतीय खासदारांचे कार्यक्रम रद्द करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मलेशिया सरकारने पाकिस्तानला फटकारले आहे आणि त्यांचे मनसुबे हाणून पाडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने ‘काश्मीर मुद्दा’ संयुक्त राष्ट्रांमध्ये असल्याचे कारण देत मलेशियातील भारतीय खासदारांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानी दूतावासाने मलेशियन सरकारच्या अधिकाऱ्यांना, “आम्ही एक इस्लामिक देश आहोत. तुम्ही एक इस्लामिक देश आहात… भारतीय प्रतिनिधी मंडळाचे ऐकू नका. मलेशियातील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करा.”असे सांगत धार्मिक कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला.
मलेशियन सरकारने पाकला फटकारले Malaysia with India।
यावर मलेशियन सरकारने पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकाऱ्यांना फटकारले आणि काहीही ऐकण्यास नकार दिला. भारतीय प्रतिनिधी मंडळाने मलेशियन सरकारला १० हून अधिक कार्यक्रम प्रस्तावित केले होते. नंतर हे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ही संपूर्ण घटना राजनैतिक सक्रियता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची वाढती प्रतिमा दर्शवते. त्याच वेळी, पाकिस्तानला दुसऱ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागला आहे.
📍Day 13 | Kuala Lumpur, Malaysia 🇮🇳🤝🇲🇾
Our Indian All-Party Parliamentary Delegation held a constructive exchange with the Parliamentary Special Committee on International Relations and International Trade, chaired by Hon’ble MP YB Wong Chen, Chairman of the Committee, along… pic.twitter.com/u80q8agPZk
— Sanjay Kumar Jha (@SanjayJhaBihar) June 3, 2025
जेडीयूचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सोमवारी रात्री भारतात परतले. माध्यमांशी बोलताना झा यांनी, “मी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पाच देशांचा (जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि मलेशिया) दौरा पूर्ण करून घरी परतलो आहे. या भेटीचा उद्देश जगाला दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या ‘नवीन सामान्य’ धोरणाबद्दल आणि ऑपरेशन सिंदूरबद्दलच्या योग्य तथ्यांची जाणीव करून देणे हा होता. या काळात, पाचही देशांमधील वरिष्ठ मंत्री, थिंक टँक आणि विविध संस्थांकडून मिळालेल्या व्यापक पाठिंब्याने मी भारावून गेलो आहे.” असे म्हटले आहे.
शिष्टमंडळात कोण होते? Malaysia with India।
जेडीयू खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळात भाजप खासदार अपराजिता सारंगी, ब्रिज लाल, प्रदान बरुआ, हेमांग जोशी, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी, सीपीएमचे जॉन ब्रिटस, काँग्रेस खासदार सलमान खुर्शीद आणि बहरीन आणि फ्रान्समधील भारताचे माजी राजदूत मोहन कुमार यांचा समावेश होता.





