मलायकाचा HOT अंदाज पाहून चाहते झाले थक्क ! पन्नाशीच्या जवळ पोहचलेली असताना देखील स्टाईलने केला रॅम्प वॉक

मुंबई – मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. ४८ वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत.नुकतीच एका कार्यक्रमात मलायका एका गाऊनमध्ये दिसून आली. त्यावेळी तिला पाहण्यासाठी सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच येऊन थांबल्या होत्या.
मलायका हॉट लूक
मलायका अरोराने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ब्लॅक बॉडी-हगिंग गाऊनमधील ग्लॅमरस लुकचे फोटो शेअर केले. फोटोमध्ये अधिक सुंदर दिसण्यासाठी मलायकाने तिचे केस खुले ठेवले होते, ज्यामध्ये मलायका आणखीनच हॉट दिसत होती. गाउनवर घातलेले स्ट्रॅपी हील्स तिचा लूकला आणखी बहार आणत होते.
मलायकाच्या हा व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी मनभरून कमेंट केल्याचे पाहायला मिळते. मलायका अरोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती शेवटची नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस आणि गीता कपूर यांच्यासोबत ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसली होती. याशिवाय मलायका फेमिना मिस इंडियाच्या जजिंग पॅनेलचाही एक भाग होती.





