Malaika Arora : “जे लोक मला आवडत नाहीत…”; ब्रेकअपनंतर मलायकाची नवीन सुरुवात; ‘ती’ पोस्ट ठरतेय चर्चेत !

Arjun Kapoor | Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर आता एकत्र नाहीत. गेले 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे अधिकृतपणे वेगळे झाले आहेत. अर्जुन कपूरने ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. तेव्हापासून मलायका अरोरा सतत सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर करत आहे. अलीकडेच मलायका अरोराने मुलगा अरहानसोबत नवीन आपल्या जीवनाची सुरुवात केली आहे.
नुकतंच, मलायका अरोरा आणि अरहान यांनी मिळून मुंबईत एक रेस्टॉरंट उघडले आहे. मलायका आणि तिचा मुलगा अरहान यांना जेवणाची खूप आवड आहे. एका मुलाखतीत मलायकाने सांगितले होते की, जेव्हा ती तिच्या मुलासोबत देश आणि जगभर फिरते तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जेवणाची चव चाखते. तेथूनच हे रेस्टॉरंट सुरू करण्याची कल्पना सुचली. असं ती म्हणाली होती.
अलीकडेच मलायका अरोरा तिचा मुलगा अरहानसोबत या रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली होती. रेस्टॉरंट सुरू करण्याची अधिकृत घोषणा अवघ्या काही तासांपूर्वी करण्यात आली होती. तेव्हापासून सगळे मलायकाचे अभिनंदन करत आहेत. या खास प्रसंगी नवीन व्यावसायिक भागीदार जुळताना दिसले.
खरं तर, मलायका अरोराच्या नव्या सुरुवातीमुळे चाहतेही खूप खूश आहेत. तिच्या ब्रेकअपची बातमी आल्यापासून अर्जुन कपूरला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. या ब्रेकअपसाठी सर्वजण त्याच्यावर आरोप करत आहेत.
दरम्यान, मलायका अरोराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी एक कोट शेअर केला आहे. त्यात लिहिले होते, ‘जे लोक मला आवडत नाहीत त्यांची काळजी करायला माझ्याकडे वेळ नाही. जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करण्यात मी व्यस्त आहे’.
खरंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या मुलालाही या नात्याबद्दल माहिती होती. त्या दोघांसोबत अनेकदा दिसले. मात्र ब्रेकअपनंतर जेव्हा अरहान आणि अर्जुन कपूर समोरासमोर आले तेव्हा कोणीही काहीही बोलले नाही. सध्या मलायकाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
अर्जुन कपूरने काढला खास टॅटू !
मलायका पासून दुरावल्यानंतर अर्जुन कपूरने पाठीवर ‘रब राखा’ असं गोंदवून घेतलं आहे. याचा अर्थही त्याने पोस्टमध्ये सांगितला आहे. “रब राखा – देव नेहमी तुझ्यासोबत राहील. माझी आई सुख आणि दु:खात नेहमी हे म्हणायची. आजही मला वाटतं की ती माझ्याबरोबर आहे. माझ्यावर लक्ष ठेवतेय आणि मला योग्य दिशा दाखवतेय’. अशी भावनिक पोस्ट अर्जुनेन लिहिली आहे.
View this post on Instagram






