कपडे घातले की नाही ? नव्या अवतारामुळे मलायका अरोरा ट्रोल

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेचा विषय बनलेली मलायका कधी-कधी चाहत्यांच्या निशाण्यावरही येते. अलीकडेच मलायका अरोराचा लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिचा जिम आउटफिट पाहून लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
खरं तर, मलायका अरोराच्या या लेटेस्ट व्हिडिओमध्ये ती अतरंगी जीम आउटफिट परिधान केलेली दिसत आहे. तसेच मलायका अरोराने खांद्यावर डेनिम जॅकेट घातले आहे. पण चर्चेचा विषय असा आहे की, मलायका अरोराने जीम आउटफिट घातलेला आहे, त्याचा रंग कुठेतरी त्वचेच्या रंगासारखा दिसतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूपच आश्चर्यचकित होत आहेत. याच कारणामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून चाहते मलायका अरोराला प्रचंड ट्रोल करत आहेत
View this post on Instagram
स्किन कलर ड्रेस घातल्यामुळे तिने कपडे घातले की नाही असा प्रश्न पहिल्यांदा पाहणाऱ्याला पडतो.या करून अनेकांनी मलायकाला ट्रोल केलं आहे. अनेकांनी तर तिला थेट कपडे घातले आहेत की नाही असा सवाल कमेंट करून विचारला आहे. तर काहींनी तू फक्त अशाच गोष्टी करून चर्चेत रहा अस म्हटलंय.
मलायका याआधीही ट्रोल झाली आहे
मलायका अरोराला सोशल मीडियावर अशाप्रकारे ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मलायका अरोरा अनेकवेळा चाहत्यांच्या टीकेची शिकार झाली आहे. मात्र, अनेक प्रसंगी मलायका ट्रोलरची पर्वा करत नाही किंवा या सगळ्याची पर्वा करत नाही, असे म्हणताना ऐकले आहे. पण बी-टाऊनच्या फिटेस्ट अभिनेत्रीबद्दल बोलायचं झालं तर त्यात मलायका अरोराचं नाव नक्कीच येईल.





