Malaika & Arjun Breakup : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर या सेलिब्रेटी कपल्सचा काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते. एकमेकांसोबत असताना दोघांच्याही नात्याची विशेष चर्चा होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूरने आता मी सिंगल असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यावेळी मलायकाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र, आता अभिनेत्रीने याविषयी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मी माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी काहीही बोलणार नसल्याचे मलायका अरोराने म्हटले आहे. एका मुलाखतीमध्ये तिने अर्जुन कपूरसोबत झालेल्या ब्रेकअपवर मौन सोडलं. सिंघम अगेन चित्रपटाच्या एका कार्यक्रमात बोलताना अर्जुन कपूरने आता मी सिंगल असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्याच्या वक्तव्यामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते. अर्जुनच्या या वक्तव्याविषयी अभिनेत्रीला एका कार्यक्रमात विचारण्यात आले. यावेळी बोलताना मलायका म्हणाली की, ‘कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मी माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी कधीही काहीही सांगणार नाही. ते मला आवडणारं नाही. त्यामुळेच अर्जुन कपूरने जे काही विधान केलं आहे, तो त्याचा अधिकार आहे. त्याच्या विशेषाधिकाराअंतर्गत त्याने हे विधान केलं आहे, त्यामुळे मला यावर काहीही बोलायचं नाही‘ ‘आता प्रत्येकाने पुढे जाण्याची आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची वेळ आली आहे’, असेही यावेळी बोलताना मलायका म्हणाली. मलायकाच्या कामाबद्दल सांगायचे तर ‘येक नंबर’ या मराठी चित्रपटाच्या गाण्यात ती झळकली होती. तर काही दिवसांपूर्वी आलेल्या सिंघम अगेन चित्रपटात अर्जुन कपूरने महत्त्वाची भूमिका साकारली होती.