छत्रपत्री संभाजीनगर : आजकाल सोशल मीडियाचे वेड सगळ्यांना लागले आहेत. जो तो व्यक्ती फेमस होण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतात. मात्र हेच वेड कधी लोकांच्या जीवावरदेखील बेतते. अशीच एक धक्कादायक घटना छत्रपत्री संभाजीनगरमधून समोर आली आहे. यामध्ये रील्स बनवणे एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. काय आहे नेमके प्रकरण? छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ हा भयानक अपघात घडला. कार मध्ये बसून रील्स बनवणे एका युतीला चांगलंच महागात पडलं. कार चालवायला नवीन असलेली तरुणी कार चालवत असताना रील्स बनवत होती. रिल बनवताना तिनं गाडी पुढे नेण्याच्या ऐवजी मागे नेली आणि तिथेच ती दरीत कोसळली. या दुर्घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्वेता दीपक सुरवसे असे मृत तरुणीचे नाव आहे, ही तरुणी आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे हे दोघेही संभाजीनगर येथून एका कारणे दत्त मंदिर परिसरात आले होते. या ठिकाणी मोबाईलवर रील्स बनवताना तिने तिच्या मित्राला सांगितले की मी पण कार चालून बघते मात्र ही तरुणी कार चालवायला नवीन असल्याने तिने कार पुढे नेण्याऐवजी रिव्हर्स घेर टाकला आणि कार मागे दरीत कोसळली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.