Zilla Parishad Election : मंद्रुळ कोळे गट व गणांतील भाजप उमेदवारांना विजयी करा, प्राची पाटील यांचे आवाहन

तळमावले – अनेक जण जिंकल्यानंतर गुलालामध्ये सामील होतात. परंतु, संघर्षाच्या काळामध्ये जे कोणी आपल्याबरोबर असतात तेच निष्ठावंत असतात.
गेले दहा वर्षापासून बनपुरी ग्रामस्थ संघर्ष करत आहेत आणि या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी मंद्रुळ कोळे गट व गणांमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उमेदवार डॉ. प्राची नरेंद्र पाटील यांनी केले.
ही लढाई पंचायत समिती व झेडपीची नसून आपल्या हक्काची लढाई आहे, येणारी निवडणूक ही आपल्या भविष्याची असून आपल्या विभागातील तरुण पिढी ही मुंबई व पुण्यासारख्या ठिकाणी कामासाठी स्थलांतरित असून या तरुण पिढीच्या समस्या सोडवण्याची भूमिका आमची आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात मजबूत विकास करण्याचं करण्याचं काम आम्ही सर्वजण करणार असून बनपुरी व गावातील असणाऱ्या वाड्या या गावचे आमचे जिव्हाळ्याचे नाते आहे तसेच गाव असं किंवा वाड्या असो नेहमीच लोकांनी आमच्यावर आशीर्वाद दिले आहेत, असे नितीन पाटील यांनी सांगितले .
कायम विकासासाठी तत्पर असून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून तळागाळातील महिला सक्षमीकरण समाज ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे, असे डॉ. प्राची पाटील यांनी सांगितले. हिंदुराव पाटील व रमेश पाटील या दोघांनी यापूर्वीही विकास कामाचा जणू मोठा डोंगरच उभा केलेला आहे.
परंतु, काही गेल्या काही वर्षापासून जो विकासाचा जो खंड पडला होता तो विकासाचा खंड सत्यजितसिंह पाटणकर यांच्यामार्फत व त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहे तसेच विकास कामे आम्ही कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
त्या बनपुरी, अंबवडे खुर्द येथे आयोजित केलेल्या प्रचार रॅली दरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीचे उमेदवार नितीन पाटील, भैया आकांशा खेडकर, पाटण अर्बन बँकेचे संचालक अंकुश मोंडे, बनपूरीचे माजी उपसरपंच शिवाजीराव पवार, आंबवडे खुर्द माजी सरपंच दत्तात्रय पाटील, शंकरराव मोडे गुरुजी, डॉ. गणेश पवार, प्रमोद पाटील, शहाजी भिलारे बाबा मोकाशी शिवाजी जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.





