Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबारातील जखमी व्यक्तींच्या प्रकृतीबाबाबत मोठी अपडेट
Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर जुहू येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेले उमेश चौहान यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत, अशी अधिकृत माहिती मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM) रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेला उमेश चौहान या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर असून, तो वैद्यकीय देखरेखीखाली आहे, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली. (Tiger Shroff)
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री जुहू येथे टायगर श्रॉफवर गोळीबार झाला, ज्यामध्ये उमेश चौहान जखमी झाले. सुरुवातीला त्यांना जुहू येथील कूपर रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन त्यांची प्रकृती स्थिर करण्यात आली. (Tiger Shroff)
त्यानंतर, अधिक विशेष वैद्यकीय सेवा आणि पुढील तपासणीसाठी त्यांना मध्यरात्री महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयाच्या अहवालानुसार, गोळी लागल्यामुळे त्यांच्या हृदय किंवा फुफ्फुसांना कोणतीही इजा झालेली नाही. (Tiger Shroff)
सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर जनरल सर्जरी विभागांतर्गत इमर्जन्सी आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. (Tiger Shroff)
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; राजस्थानमधून तिघांना अटक



