Malaika Arora and Arjun Kapoor : मोठा खुलासा! ‘या’ कारणामुळे नात्याचा शेवट? अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या ब्रेकअपचं कारण आलं समोर
Malaika Arora and Arjun Kapoor : आता या ब्रेकअपमागील कथित कारणाबाबत एक मोठा दावा समोर आला आहे.

Reason for Arjun Kapoor and Malaika’s breakup : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या एका मिस्ट्री मॅनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा मिस्ट्री मॅन ३३ वर्षीय डायमंड मर्चंट हर्ष मेहता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मलायकाने या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. हर्ष मेहता हा मलायकापेक्षा जवळपास १९ वर्षांनी लहान असल्याचेही म्हटले जात आहे.
दरम्यान, मलायका याआधी अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिप होती. दोघेही अनेकदा पार्टी, सार्वजनिक कार्यक्रम आणि इतर ठिकाणी एकत्र दिसायचे. २०१८-१९ च्या सुमारास त्यांच्या नात्याला सुरुवात झाली होती. मात्र, २०२४ मध्ये दोघांनीही हे नाते संपवल्याचे समोर आले. त्यांच्या ब्रेकअपचे नेमके कारण काय, याबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या.
आता या ब्रेकअपमागील कथित कारणाबाबत एक मोठा दावा समोर आला आहे. ‘हिंदी रश’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मनोरंजन पत्रकार विकी लालवाणी यांनी मलायका आणि अर्जुन लग्न करणार होते, असा दावा केला आहे.
विकी लालवाणी यांच्या दाव्यानुसार, मलायका आणि अर्जुन यांच्यात खूप प्रेम होते. मात्र, मलायकाला लग्न करायचे होते, तर अर्जुन कदाचित त्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि अखेर त्यांचे नाते संपुष्टात आले, असे त्यांनी सांगितले.
गेल्या ८-१० महिन्यांपासून मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या तसेच पुन्हा एकत्र येण्याच्या अफवा पसरत होत्या. मात्र, नंतर आपल्याला त्यांच्या मतभेदामागील कारण ‘लग्न’ असल्याचे समजल्याचे लालवाणी यांनी म्हटले आहे.
“माझ्या सूत्रांनुसार, मलायकाचे लग्न होणार होते. अर्जुन कदाचित लग्नासाठी तयार नव्हता. किंवा कदाचित त्याने मलायकाला सांगितले असेल की तो नंतर लग्न करेल. त्यावेळी मलायकाला लग्न करायचे होते. त्यामुळे एका व्यक्तीला लग्न करायचे असेल आणि दुसऱ्याला नसेल, तर नाते पुढे जाणे कठीण होते,” असा दावा विकी लालवाणी यांनी केला.
मलायका आणि अर्जुन जवळपास पाच ते सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअपनंतर एका मुलाखतीत मलायकाने अर्जुन कपूर तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग राहिला असल्याचे म्हटले होते. दरम्यान, मलायकाचे नाव हर्ष मेहतासोबत जोडले जात असले तरी, या चर्चांवर अभिनेत्रीने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Pune District : भाजीपाल्याला भाव नाही; शेतकरी आर्थिक विवंचनेत!





