“मतदान कार्डांमध्ये मोठा घोळ”; विधानसभा निवडणूकांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

Chandrashekhar Bawankule | लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. येत्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूकांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मालेगाव, धुळे मधील मतदान कार्डांमध्ये मोठा घोळ झाला असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचे देखील बावनकुळे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
“धुळे आणि मालेगाव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन हजारांहून अधिक मतदारांच्या नोंदणींमध्ये घोळ झाला आहे. या मतदारांची नोंदणी मालेगावमध्ये आणि धुळे विधानसभा मतदारसंघामध्येही आहे. मतदान कार्डावरील क्रमांक, फोटो यांसारख्या सगळ्याच बाबी एकसारख्या आहेत. जर धुळ्याची जागा पाडायची असेल तर धुळ्यात मतदान करायचे आणि मालेगावची जागा पाडायची असेल तर मालेगावमध्ये मतदान करायचे, या मानसिकतेतून असे प्रकार महाराष्ट्रातील ३०-४० विधानसभा मतदारसंघांमध्ये घडले आहेत, असे मला वाटते. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून असे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत.”
#WATCH | Mumbai: Maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule says, ” In Dhule and Malegaon Assembly constituency, there are more than 3000 entries which are in Dhule as well as in Malegoan..voter ID number, photo all are same. When the Election Commission have digitalised… pic.twitter.com/0n79QwKfvP
— ANI (@ANI) July 19, 2024
पुढे ते म्हणाले की, “आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. मात्र, खासकरुन मुस्लीम समाजाचीच तीन हजार मते धुळ्यात आहेत, तीच मते मालेगावमध्ये आहेत. सारखेच, क्रमांक, सारखेच फोटो आणि सारखेच मतदान कार्ड दोन्ही मतदारसंघांमध्ये कसे असू शकतात? याचा अर्थ हे जाणूनबुजून करण्यात आलेले षड्यंत्र आहे.“ Chandrashekhar Bawankule |
“२०१९ मध्ये काही बूथवर असणाऱ्या आमच्या मतदारांची नावेच मतदार यादीतून रद्द करण्यात आली आहेत. आता आम्ही निवडणूक आयोगाला पुन्हा विनंती केली आहे की, जिथे जिथे असा प्रकार घडला आहे, तिथे जाऊन, चौकशी करुन पुन्हा त्यांची नावे मतदार यादीत घेण्यात यावीत.” दरम्यान, महाराष्ट्रात २८८ जागांसाठी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.
हेही वाचा:
एका वर्षात १५ अग्निवीरांचे बलिदान; नऊहून अधिक आत्महत्या; काही संशयास्पद मृत्यू





