Political News : मोठी घडामोड..! आणखी एका पक्षात उभी फूट? ९ आमदार भाजपमध्ये जाणार; राजकारणात खळबळ
Political News : ईशान्य भारतातील मेघालय राज्याच्या राजकारणात एक मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Political News : मेघालयच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (UDP) मधील तब्बल नऊ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. (Political News)
यासोबतच तृणमूल काँग्रेसचे चार आमदारही भाजपमध्ये जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ६० सदस्यांच्या मेघालय विधानसभेतील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. (Political News)
सध्या विधानसभेत भाजपचे केवळ दोन आमदार आहेत. मात्र, UDP आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदारांचा गट भाजपमध्ये दाखल झाल्यास भाजपची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. या संभाव्य पक्षप्रवेशामुळे सत्ताधारी आघाडी तसेच विरोधकांच्या राजकारणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. (Political News)
UDP आणि TMC आमदार भाजपच्या संपर्कात?
सूत्रांच्या माहितीनुसार, UDPचे १२ पैकी नऊ आमदार आणि तृणमूल काँग्रेसचे चार आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या संभाव्य गटात मेघालयचे माजी मुख्यमंत्री डॉ. मुकुल संगमा यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. (Political News)
या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून केंद्रीय पातळीवर चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. यातील काही आमदारांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचेही सांगितले जात आहे. (Political News)
मंत्रिमंडळ फेरबदलानंतर UDPमध्ये नाराजी
नॅशनल पीपल्स पार्टीच्या (NPP) नेतृत्वाखालील मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्स सरकारमध्ये UDP हा भागीदार पक्ष आहे. मात्र, सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलानंतर UDPमध्ये अंतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा आहे. (Political News)
पर्यटन मंत्री पॉल लिंगडोह यांच्या जागी पक्षाचे अध्यक्ष मेटबाह लिंगडोह यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यानंतर पक्षातील गटबाजी आणखी वाढल्याचे बोलले जात आहे. २०२८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी UDPमधील ही अंतर्गत दरी अधिक तीव्र झाल्याची चर्चा आहे. (Political News)
पक्षांतरबंदी कायद्याचा अडथळा येणार?
UDPमधील एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत स्पष्ट दुजोरा दिलेला नाही. मात्र, पुरेसे संख्याबळ असल्यास पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदींना बगल देणे शक्य असल्याचे त्यांनी सूचित केले. (Political News)
यापूर्वी UDP नेते पॉल लिंगडोह यांनीही भाजपमध्ये आमदार जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. मात्र, या हालचालींबाबत आपल्याकडे पुरेशी माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले होते. (Political News)
भाजपाची भूमिका काय?
मेघालय भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, प्रदेशाध्यक्षांनी UDPच्या आमदारांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, आता या संदर्भातील चर्चा केंद्रीय नेत्यांच्या पातळीवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या घडामोडींवर कोणताही अंदाज व्यक्त न करता अंतिम निर्णयाची वाट पाहणार असल्याची भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे. (Political News)
दरम्यान, UDP आणि TMCमधील आमदारांचा संभाव्य भाजप प्रवेश प्रत्यक्षात झाला तर मेघालयच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. मात्र, सध्या ही चर्चा आणि संभाव्य पक्षप्रवेशाची माहिती अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. (Political News)
Political News : काँग्रेसला मोठा धक्का; १०० हुन अधिक पदाधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे





