Uddhav Thackeray : ठाकरे गटाला मोठा हादरा! जिल्हाप्रमुखांनी सोडली साथ, हाती धनुष्यबाण घेणार
Uddhav Thackeray : विशेष म्हणजे, भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनादरम्यान पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या त्यांच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती.

Uddhav Thackeray : अमरावतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे अमरावती जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना नेते बच्चू कडू यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पडोळे यांनी हा निर्णय घेतला. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि काही संघटनात्मक कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Uddhav Thackeray)
नरेंद्र पडोळे यांच्याकडे अचलपूर आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघांची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते ठाकरे गटाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. संघटन बांधणी, जनआंदोलने आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका घेतली होती.
विशेष म्हणजे, भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनादरम्यान पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या त्यांच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. त्यामुळे अमरावतीतील प्रभावी नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. (Uddhav Thackeray)
जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी झालेल्या या पक्षांतरामुळे अमरावतीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पडोळे यांच्या शिंदेसेना प्रवेशामुळे ठाकरे गटाची ताकद कमी होण्याची, तर शिंदे गटाला नवसंजीवनी मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.
बड्या नेत्याची हकालपट्टी (Uddhav Thackeray)
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने आज मोठी कारवाई केली. उद्धव ठाकरे यांना शेवटच्या क्षणी धोका देणाऱ्या उपनेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. कोकण मतदारसंघातून माघार घेणारे उमेदवार बाळ माने यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत बाळ माने यांच्यावरील कारवाईची माहिती दिली. पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याबद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली असल्याचे संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.




