Moshi Accident: मोशी दुर्घटनेतील 9 कामगारांच्या मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल
Moshi Accident: दुर्घटनेत नऊ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी

पिंपरी-चिंचवड: मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनाप्रकरणी अखेर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अॅटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी सोहन निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १०५, १२५(अ), १२५(ब) आणि ३(५) अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
८ जुलै रोजी मोशी येथील कचरा डेपोमध्ये एसएलएफचा काही भाग ढासळून इमारतीवर आणि रस्त्यावर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत नऊ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. (Moshi Accident)
दरम्यान, पावसाळ्यात एसएलएफ सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीसांकडून केला जात आहे.
हेही वाचा:





