इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गुटख्यासह 30 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Updated On:
इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गुटख्यासह 30 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

इंदापूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्हया कडे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर इंदापूर पोलिसांनी अवैध गुटख्यासह तब्बल तीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुटखा माफियांना वटणीवर आणणारी ही चौथी यशस्वी कारवाई इंदापूर पोलिसांनी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

यासंदर्भात माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक टि.वाय. मुजावर म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातून इंदापूर हद्दीत अवैध गुटखा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती आम्हास मिळाली. या माहितीच्या आधारावर (18 मार्च) शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आम्ही ठोस कारवाई केलेली आहे.

“गुटखा माफियांच्या मुसक्या आवळणारे पोलीस ठाणे “

इंदापूर पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून तय्यब मुजावर रुजू झाल्यापासून गुटखा माफियांच्या मुसक्‍या अत्यंत अचूक पद्धतीने आवळण्याची किमया सुरू आहे. त्यामुळे नको रे बाबा इंदापूर मधून अवैध गुटख्याची वाहतूक… असे म्हणण्याची वेळ गुटखा माफियांवर आलेली दिसते.

यामध्ये 20 लाख किमतीचा गुटखा तर 10 लाख रुपये किंमतीचे चाकी टेम्पो वाहन जप्त करण्यात आले आहे. आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक के.ए. 01. ए.एल. 9121 या टेम्पोत गुटखा वाहतूक होत असताना पोलिसांनी पकडली. शासनाची बंदी असलेल्या आर. के. कंपनीचा गुटखा या कारवाईत पोलिसांना मिळाला.

ही कारवाई इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने,यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक पोलीस कॉन्स्टेबल यांनी यशस्वीरित्या केलेली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Dowry Harassment : धक्कादायक! इंदापुरात सासरच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; तिघांविरोधात गुन्हा दाखल

2026-05-01 04:45:29

Dowry Harassment : धक्कादायक! इंदापुरात सासरच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Lakhewadi Theft : इंदापुरात अट्टल चोरट्यांचा धुमाकूळ! लाखेवाडीत दुकान फोडून ४ लाखांचा माल लंपास

2026-04-19 03:30:38

Lakhewadi Theft : इंदापुरात अट्टल चोरट्यांचा धुमाकूळ! लाखेवाडीत दुकान फोडून ४ लाखांचा माल लंपास

Nimgaon Ketki Accident : निमगाव केतकी हादरले! टेम्पोच्या भीषण धडकेत २० वर्षीय तरुणाचा जागीच अंत; ग्रामस्थांचा संताप

2026-04-18 03:30:08

Nimgaon Ketki Accident : निमगाव केतकी हादरले! टेम्पोच्या भीषण धडकेत २० वर्षीय तरुणाचा जागीच अंत; ग्रामस्थांचा संताप

Indapur Crime : वडापुरीत दहशतीची रात्र ! शेळी मालकावर जीवघेणा हल्ला; ४ जनावरे केले लंपास

2026-02-12 05:15:04

Indapur Crime : वडापुरीत दहशतीची रात्र ! शेळी मालकावर जीवघेणा हल्ला; ४ जनावरे केले लंपास

Santosh Bangar : आमदार संतोष बांगरांवर मोठी कारवाई, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

2025-12-02 16:08:14

Santosh Bangar : आमदार संतोष बांगरांवर मोठी कारवाई, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल