Pandharpur : पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात मोठी दुर्घटना; 4 मजूर ढिगाऱ्याखाली अडकले
Pandharpur : या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ
Updated On:

Pandharpur : पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात आज मोठी दुर्घटना घडली आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत चार मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निवास शिंदे यांच्या शेतात हे काम चालू होते. मात्र या ढिगाऱ्याखाली मंगेश मोरे, सिद्धेश्वर घाडगे (राहणार रांजणी तालुका पंढरपूर) आणि तानाजी घोडके व आबा घोडके (दोघे राहणार अनवली तालुका पंढरपूर) हे मजुर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.





