पंतप्रधानांकडून आर्थिक मदतीची घोषणा
\nया दुर्घटनेबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एक्सवर पोस्ट करत शोक व्यक्त केला. “चेन्नईतील बांधकाम कोसळण्याच्या दुर्घटनेमुळे मी अत्यंत दुखी आहे. या संकटाच्या क्षणी माझ्या संवेदना पीडित कुटुंबांसोबत आहेत. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल,” असे पीएमओने जाहीर केले.
मृतक मजूर आसाम आणि ओडिशाचे –
\nतमिळनाडू विद्युत मंडळाचे सचिव आणि तमिळनाडू उत्पादन व वितरण निगमाचे (TANGEDCO) अध्यक्ष डॉ. जे. राधाकृष्णन यांनी सांगितले की, मृत्यू झालेले मजूर आसाम आणि परिसरातील होते. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) चे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सध्या बचाव कार्य आणि तपास युद्धपातळीवर सुरू आहे.
बचाव कार्याला गती –
\nअपघातानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. अनेक मजूर आर्चरखाली दबले गेले होते, ज्यांना मोठ्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले. घटनास्थळावरून जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. तमिळनाडू प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे बांधकाम स्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.