माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंचा नातू जान्हवी कपूरच्या प्रेमात

मुंबई – बॉलिवूडमध्ये दिवाळीची धूम सुरू आहे. बी टाऊनचे स्टार्स दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी एक भव्य पार्टी आयोजित केली होती. बॉलीवूडच्या दिवाळी पार्ट्या ताऱ्यांच्या झगमगाटाने उजळून निघाल्या होत्या. पण दिवाळी पार्टीत जान्हवी कपूरला तिच्या एक्ससोबत एन्ट्री घेताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
दरम्यान, जान्हवी कपूरने लेखक-निर्माता अमृत पाल बिंद्रा यांच्या दिवाळी पार्टीत तिचा माजी प्रियकर शिखर परिहारसोबत प्रवेश केला. जान्हवीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत पार्टीत सहभागी होताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. जान्हवी आणि शिखर परिहारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर चमकदार साडीत कारमध्ये बसलेली दिसत आहे. जान्हवीसोबत शिखर परिहार हा कार चालवत आहे. पापाराझींना पाहून जान्हवीही हसताना दिसत आहे.
कोण आहे जान्हवी कपूरचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहारिया?
जान्हवी कपूर आणि शिखर परिहार यांनी एकमेकांना डेट केल्याचे वृत्त आहे. शिखर परिहार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत. मात्र, आता पुन्हा एकदा जान्हवी आणि शिखर एकत्र दिसल्याने त्यांच्या वाढत्या जवळीकीच्या बातम्या पुन्हा व्हायरल होऊ लागल्या आहेत. आता त्यांच्या नात्याचे सत्य काय आहे, हे फक्त जान्हवीच सांगू शकते.
जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘मिली’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी पहिल्यांदाच तिचे वडील बोनी कपूरसोबत काम करत आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. मिली व्यतिरिक्त जान्हवी वरुण धवनसोबतही धमाल करताना दिसणार आहे. जान्हवी राजकुमार रावसोबत मिस्टर अँड मिसेस माहीमध्येही काम करत आहे. एकूणच, जान्हवीकडे सध्या भरपूर चित्रपट आहेत.





