पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर देखरेख; वाहतूक नियंत्रण यंत्रणेचे काम पूर्ण

पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रस्ते विकास महामंडळाकडून ९४ कि.मी. अंतरात रस्त्यावर आयटीएमएस सिस्टीम (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट) बसविण्याचे सुरू असलेले काम जवळपास पूर्ण झाले आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी या सिस्टीमचा वापर होणार आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवले जाणार असल्याने यातून अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे.
वण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वी हाती घेतले होते. ते सध्या पूर्ण झाले असून ही पद्धत नुकतीच सुरू केली आहे. आयटीएमएस म्हणजे इंटेलिजंट पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेत रस्ते विकास महामंडळाने ९४ कि. मी. अंतरात महामर्गावर आयटीएमएस सिस्टिम बसवण्याचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू केले होते. हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिममध्ये सॅटेलाइटद्वारे संपूर्ण माहिती नियंत्रण कक्षाकडे ताततडीने पाठविले जाते.
९४ कि.मी. महामार्गावर अपघातग्रस्त १०६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे आयटीएमएस पद्धतीने सॅटेलाइटद्वारे कुसगाव येथील नियंत्रण कक्षाला जोडले आहेत. याद्वारे वाहनांच्या सर्व हालचाली लक्षात येणार आहेत. यातून वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे जाणार आहे.
वेगाने वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे, लेन कटिंग यासह बेशिस्त वाहनांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. महामार्गावर कोणतीही घटना घडली तर त्याची माहिती नियंत्रण कक्षाला तत्काळ समजणार आहे. यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने अपघातग्रस्तांना मदत मिळणार आहे.
सिस्टिममुळे फास्ट कारवाई…
वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे दंड आकारणी होत आहे. चालकांना किमान ५०० ते दोन हजार रुपयांपर्यंत दंड भरणा करावा लागत आहे. अनेकवेळा बोरघाटात रस्ता मोकळा असल्याने वेग मर्यादा मोडीत वाहनचालक सुसाट सुटतात. अशी वाहनांची या सिस्टिममध्ये नोंद होते त्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर आरटीओ कळविण्यात येत असल्याने विशेष पथक अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत आहे.





