Mahua Moitra Marriage । तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांचे लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी बिजू जनता दलाच्या नेत्या आणि खासदार पिनाकी मिश्रा यांना आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. दोघांकडूनही लग्नाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. महुआ आणि पिनाकी यांचे लग्न जर्मनीमध्ये झाल्याचा दावा अहवालांमध्ये करण्यात आला आहे. दोघांचाही एक फोटो समोर आला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्रातील वृत्तानुसार, महुआ आणि पिनाकी यांनी जर्मनीमध्ये शांतपणे लग्न केले. या प्रकरणावर टीएमसीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. महुआ त्यांच्या राजकीय आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या आहेत. महुआचे पूर्वी डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉर्सनसोबत विविह झाला होता. परंतु त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. जेव्हा महुआ दुसऱ्यांदा खासदार झाल्या महुआ मोईत्रा खासदार म्हणून दुसऱ्यांदा काम करत आहेत. त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील कृष्णा नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली. महुआने ही निवडणूक जिंकली होती. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कल्याण चौबे यांचा पराभव केला होता. महुआ दुसऱ्यांदा या जागेवरून निवडून आल्या. यावेळी त्यांनी भाजप उमेदवार अमृता रॉय यांचा पराभव केला होता. महुआ मोईत्रा यांचा पहिला कार्यकाळ खूपच वादग्रस्त होता. त्याच्यावर पैशाच्या बदल्यात प्रश्न विचारल्याचा आरोप होता. महुआ ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात अडकल्या होत्या. त्यांचे लोकसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले, जरी महुआनेही या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. एवढे नाही तर महुआ यांच्यावर संसदेचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड त्यांचे मित्र हिरानंदानीसोबत शेअर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता. पिनाकीचे वैयक्तिक आयुष्य कसे? Mahua Moitra Marriage । बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते पुरीचे खासदार आहेत. लोकसभेच्या आकडेवारीनुसार, पिनाकीचे पहिले लग्न संगीता मिश्रा यांच्याशी झाले होते. पिनाकी आणि संगीता यांचे लग्न १६ जानेवारी १९८४ रोजी झाले. दोघांनाही दोन मुले आहेत, पण आता पिनाकी महुआसोबत लग्नबंधनात अडकले आहेत. महुआ मोईत्रा यांचे पती पिनाकी मिश्रा हे बीजेडीचे एक शक्तिशाली नेते आहेत. त्यांचा जन्म १९५९ मध्ये झाला. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री ब्रजेश किशोर त्रिपाठी यांचा पराभव केला होता. पिनाकी हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आहेत. त्यांची जवळजवळ तीन दशकांची दीर्घ राजकीय आणि कायदेशीर कारकीर्द आहे. ते अनेक उच्चस्तरीय समित्यांचे सदस्यही राहिले आहेत.