“मोदी सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्ट” ; NEET पेपर लीक प्रकरणावरून महुआ मोईत्रा यांची टीका

Mahua Moitra Attacked BJP । मागील काही महिन्यांपासून सतत चर्चेत असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पुन्हा एकदा संसदेत एंट्री घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर महुआ मोईत्रा 18व्या लोकसभेच्या पहिल्याच दिवशी संसदेत पोहोचल्या. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना महुआ मोईत्रा यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले. NEET पेपर लीक प्रकरणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना,”लाखो लोकांची मेहनत वाया गेली आहे. शेवटच्या क्षणी पेपर रद्द झाल्याने त्यांचे करिअर धोक्यात आले आहे” असे महुआ मोइत्रा यांनी म्हटले.
‘जनतेने भाजपला धडा शिकवला’ Mahua Moitra Attacked BJP ।
पुढे महुआ मोईत्रा म्हणाल्या, “हे सर्व असूनही ज्या माजी शिक्षणमंत्र्यांच्या कार्यकाळात हे सर्व घडले त्यांना पुन्हा शिक्षणमंत्री करण्यात आले आहे. मात्र, जनतेने त्यांना धडा शिकवला आहे. 303 वरून हे लोक 242 वर आले आहेत. आता असेच चालू राहिले तर कुठे पोहचली कुणास ठाऊक. असे म्हणत केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
कोण आहे महुआ मोईत्रा? Mahua Moitra Attacked BJP ।
महुआचा जन्म 1974 साली आसामच्या कछार जिल्ह्यात झाला. महुआने आपले शिक्षण राजधानी कोलकाता येथून केले आहे. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर महुआला त्यांच्या कुटुंबाने पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवले. TMC खासदाराने 1998 मध्ये मॅसॅच्युसेट्समधील माउंट होल्योक कॉलेज साउथ हॅडली येथून अर्थशास्त्र आणि गणित विषयात पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर महुआने प्रतिष्ठित बँकिंग कंपनी जेपी मॉर्गन चेसमध्ये काम केले. त्यांनी न्यूयॉर्क आणि लंडन या दोन्ही ठिकाणी काम केले.
महुआ मोईत्रा ही चाणाक्ष नेता म्हणून ओळखल्या जातात. सभागृहात दिलेली त्यांची भाषणे नेहमीच व्हायरल होतात. महुआ एक कुशल वक्ता आणि उत्कृष्ट नेता म्हणून ओळखल्या जातात. मात्र, महुआ राजकारणात येण्यापूर्वी एक यशस्वी बँकर होत्या हे फार कमी लोकांना माहीत आहे. महुआ मोईत्रा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर विजय मिळवला.





