जय भानुशालीसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर माही विजने सोडलं मौन

Mahhi Vij | अभिनेत्री माही विज आणि अभिनेता जय भानुशाली सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. १४ वर्षांनंतर हे दोन्ही कपल विभक्त होणार असल्याच्या चर्चा समोर येताच चाहत्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. मात्र घटस्फोट झाल्याच्या या चर्चांवर जय किंवा माहीने कोणतीच माहिती अधिकृतरित्या माहिती दिली नव्हती. अखेर या चर्चांवर माहीने मौन सोडले आहे. ‘खोट नरेटिव्ह’ असल्यातं सांगत माहीने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
एका इंस्टाग्राम पेजवर दावा करण्यात आला होता की, अभिनेता जय भानुशाली आणि अभिनेत्री माही विज यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून, दोघे घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत. तसंच माही आणि त्याची मुलगी ताराच्या वाढदिवसाच्या पार्टीत शेवटचे एकत्र दिसले होते.” या पोस्टवर माहीनं कमेंट करत उत्तर दिलं आहे. “खोट्या बातम्या पसरवू नका. मी याविरुद्ध कायदेशीर कारवाई करेन,” असा इशाराच तिने दिला आहे. तिच्या या भूमिकेला नेटकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. Mahhi Vij |
View this post on Instagram
जय आणि माही यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा या केवळ चर्चाच असल्याचं कळत आहे. त्यात आता स्वत: माहीनं देखील अशा चर्चा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांबद्दल कायदेशीर कारवाई करणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. Mahhi Vij |
दरम्यान, जय भानुशाली आणि माही विज यांचे 2011 साली लग्न झालं. त्यांना तीन मुलं आहेत. मुलगी तारा हिचा जन्म 2019 साली झाला. तर राजवीर आणि खुशी, या दोघांना त्यांनी 2017 साली दत्तक घेतलं. Mahhi Vij |
हेही वाचा:
‘मल्लाहचा मुलगा उपमुख्यमंत्री बनू शकतो, तर मग मोहम्मदचा मुलगा का नाही?’ ओवैसींचा थेट सवाल





