Karjat News : महेश वैद्य उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित
Karjat News : जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना महेश वैद्य यांचा गौरव करण्यात आला.

कर्जत : उद्योग क्षेत्रात अतीशय उल्लेखनीय कामगिरी करणारे पी डी ऍण्ड सन्स चे मालक महेश पुरुषोत्तम वैद्य यांना उद्योग आघाडीच्या वतीने उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन पनवेल येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते.यावेळी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योजगांचा गौरव करण्यात आला.
कर्जतच्या पी डी ऍण्ड संसने आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे कंपनीच्या जगभरात प्रसिध्द असलेल्या आवळा सुपारीला मोठी मागणी आहे.
दर्जेदार उत्पादन आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर कंपनीने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. रायगड जिल्ह्यातून उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजक म्हणून महेश वैद्य यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना महेश वैद्य यांचा गौरव करण्यात आला. या सन्मानानंतर महेश वैद्य यांच्यावर विविध क्षेत्रातून कौतुकांचा वर्षाव करण्यात आला कर्जत च्या उद्योग क्षेत्राची ओळख व्यापक करण्यासाठी पी डी ऍण्ड संसचे योगदान महत्वपूर्ण ठरतं असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली





