Devmanus Movie | नवीन वर्षात ‘देवमाणूस’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रेणुका शहाणे आणि महेश मांजरेकर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. हा बहुप्रतीक्षित सिनेमा 25 एप्रिल 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ हा एक मल्टिस्टारर सिनेमा आहे. ज्यामध्ये अभिनेते महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत दिसणार आहे ‘तू झुठी मैं मकार’, ‘दे दे प्यार दे’, ‘मलंग’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘वध’ यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमा बनवणारे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांचे लव फिल्म्स हे प्रोडक्शन हाऊस या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. Devmanus Movie | ‘देवमाणूस’बद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस देऊस्कर म्हणतात, “देवमाणूस प्रेक्षकांना वेगवेगळ्या भावनांचा अनुभव देईल. यात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थसारखे उत्तम कलाकार आहेत. त्यांच्यामुळे चित्रपटात असलेली पात्र मी पडद्यावर जिवंत करू शकलो. आम्ही निर्माण केलेले हे जग प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे.” Devmanus Movie | विशेष म्हणजे लव रंजन हे बॉलीवूडचे दिग्दर्शक असून त्यांची निर्मिती संस्था पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. दरम्यान, महेश मांजरेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा उमटवला आहे. ‘दबंग’, ‘रेडी’, ‘वास्तव’, ‘नटसम्राट’ आणि ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. तर रेणुका शहाणे यांना ‘हम आपके है कौन’ या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. Devmanus Movie | हेही वाचा: “राज्याचे गृहमंत्री करताहेत तरी काय?”; सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यावरून वर्षा गायकवाडांचा सवाल