‘महेंद्रसिंग धोनी’ने सुरू केला आयपीएलसाठी सराव; जबरदस्त फोटो व्हायरल, क्रिकेट विश्वात रंगली चर्चा…

नवी दिल्ली – भारताचा अष्टपैलू फलंदाज, माजी कर्णधार, यष्टीरक्षक अशी ओळख असलेल्या ‘महेंद्रसिंग धोनी’ने काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 15 आॅगस्ट 2020 रोजी इंस्टाग्रामवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घेत असल्याची घोषणा धोनीने केली होती. तेव्हा पासून धोनी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसला नाही. महेंद्र सिंग धोनी एकदिवसीय विश्वकरंडक 2019 च्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची मॅच खेळला होता. मात्र, असं असलं तरी धोनी आयपीएल खेळत राहणार आहे.
दरम्यान, धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे, पण तरीही त्याचे वलय मात्र कमी झालेले नाही. धोनी आता 41 वर्षांचा झाला आहे. पण तरीही तो आयपीएल खेळतो. आयपीएलपूर्वी धोनी कसून सराव करतो, यात कोणतीच गोष्ट नवीन नाही. सध्या सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो तुफान व्हायरल होताना दिसत असून, संपूर्ण क्रिकेट विश्वात आता याच फोटोची चर्चा रंगू लागली आहे.
धोनी या फोटोत चेन्नई सुपर किंग्ससाठी सराव करत आहे. या फोटोत धोनी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात आहे. पण धोनीच्या सरावापेक्षा किंवा फटक्यापेक्षा त्याच्या हाताच्या दंडाची (बायसेपची) जोरदार चर्चा सुरु झाली आहे. धोनी हा एक महान फिनिशर होता. जोरदार ताकदीच्या बळावर धोनीने अनेक सामन्यांवर आपले नाव कोरले आहे. कणखर मानसीकता आणि ताकद या दोन्ही गोष्टी धोनीकडे अजूनही आहेत. हे सगळंच या फोटोमधून स्पष्ट होत आहे.





