राज्यात महायुतीचे प्रचंड काम : भरत गोगावले

हडपसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुती सरकारने सर्वाधिक वेगाने सर्व निर्णय घेतले. राज्यात अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या. शेतकरी, महिला, ज्येष्ठ, शाळकरी विद्यार्थी ते उद्योजक आणि इतर तरुणांना या योजनांचा लाभ होतो आहे त्यामुळे या सर्व गोष्टीची जाणीव मतदार ठेवतील आणि यामुळेच सर्वाधिक जागांवर महायुती विजयी होईल, असा विश्वास शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी व्यक्त केला.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोदनाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोगावले बोलत होते. यावेळी कर्नाटकचे आमदार प्रताप कुमार गौडा, आमदार योगेश टिळेकर, शिवसेना जिल्हा अध्यक्ष उल्हास तुपे, माजी नगरसेवक मारुती तुपे, अभिमन्यू भानगिरे, अभिजीत बोराटे, संजय लोणकर, डॉ.शंतनु जगदाळे, सविता घुले, मनोज घुले, खन्नासिंग कल्याणी, संतोष रजपूत आदी उपस्थित होत्या.
आमदार योगेश टिळेकर म्हणाले की, हडपसर भागात मी असेल, चेतन तुपे आणि नाना भानगिरे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. महायुतीची सरकार येण्याकरीता चेतन तुपे यांच्या घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून निवडून द्यावे. प्रमोदनाना भानगिरे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात मतदारांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विकास करण्याकरिता त्यांनी अनेक योजना आणल्या आहेत. हडपसर भागात तीनशे कोटी रुपयांचा निधी देऊन विकासकामांना चालना दिली आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेली विकासकामे अधिक गतिमान करण्यासाठी महायुतीचे घड्याळ निवडून देण्याचे आवाहन उमेदवार चेतन तुपे यांनी केले.





