शेतकरी कर्जमाफीबाबत महायुतीमधील मंत्र्याने दिली महत्त्वाची माहिती; “देवेंद्र फडणवीस लवकरच….”

CM Devendra Fadnavis | राज्यातील अनेक भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असताना ओढवलेल्या संकटाने शेतकऱ्याची चिंता अधिकच वाढली आहे. याचदरम्यान आता मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठे विधान केले आहे.
संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली. हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील प्रयोगशील 13 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. CM Devendra Fadnavis |
मंत्री संजय राठोड यांनी कृषी गौरव पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन करत हा पुरस्कार नसून नव्या पिढीला दिलेला ठेवा असल्याचे म्हंटले. संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील. महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख आहे. राज्याच्या प्रमुखांकडून लवकरच याची घोषणा केली जाईल, असे सूचक विधान केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. CM Devendra Fadnavis |
शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहित आहेत – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
मी शेतकरी पुत्र, माझा जन्म शेतकरी घरात झाला आहे. सकाळी उठलो तरी मला शेती दिसते, रात्री झोपायला गेल्यावर ही शेती दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहित आहेत, असे म्हणत शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले होते.
ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी
वारंवार कर्जमाफीची मागणी केली जात असताना देखील अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. यातच आता मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानामुळे कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला आहे. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी केली जात आहे. CM Devendra Fadnavis |
हेही वाचा :




