Vidhan Parishad Election 2026 : मोठी बातमी..! महायुतीचे अंतिम जागावाटप जाहीर; कोणत्या पक्षाला किती जागा? पाहा संपूर्ण यादी!
Vidhan Parishad Election 2026 : स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे.

Vidhan Parishad Election 2026 : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात 17 जागांचे अंतिम वाटप निश्चित करण्यात आले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11 जागांवर, शिवसेना 4 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे. (Vidhan Parishad Election 2026)
महायुतीतील जागावाटपात भाजपने सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत. तर सुरुवातीला सात जागांवर दावा करणाऱ्या शिवसेनेला अखेर चार जागांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अतिरिक्त एक जागा मिळवत पुणे आणि कोकण या महत्त्वाच्या मतदारसंघांवर आपला दावा कायम ठेवला आहे. (Vidhan Parishad Election 2026)
महायुतीचे अंतिम जागावाटप
भाजप – 11 जागा
- सोलापूर
- जळगाव
- भंडारा-गोंदिया
- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
- अमरावती
- धाराशिव-लातूर-बीड
- नागपूर
- छत्रपती संभाजीनगर-जालना
- अहिल्यानगर
- सांगली-सातारा
- नांदेड
शिवसेना – 4 जागा
- ठाणे
- नाशिक
- परभणी-हिंगोली
- यवतमाळ
राष्ट्रवादी काँग्रेस – 2 जागा
- कोकण (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
- पुणे
कोकण आणि पुण्यावर राष्ट्रवादीची मोहर
महायुतीतील सर्वाधिक रस्सीखेच पुणे आणि कोकणच्या जागांवर होती. शिवसेनेने या जागांवर दावा केला होता. मात्र अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही जागा कायम ठेवण्यात यश मिळवले. कोकणातून अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली आहे. (Vidhan Parishad Election 2026)
शिवसेनेला चार जागांवर समाधान
शिवसेनेने सुरुवातीला सात जागांवर दावा केला होता. मात्र महायुतीच्या अंतिम बैठकीत ठाणे, नाशिक, परभणी-हिंगोली आणि यवतमाळ या चार जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या. त्यामुळे काही मतदारसंघांतील इच्छुक नेत्यांची नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Vidhan Parishad Election 2026)
भाजपची सर्वाधिक ताकद
महायुतीतील प्रमुख पक्ष म्हणून भाजपने 17 पैकी 11 जागा मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागा भाजपच्या वाट्याला गेल्या आहेत. (Vidhan Parishad Election 2026)
निवडणुकीचे वेळापत्रक
- अधिसूचना : 25 मे 2026
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : 1 जून 2026
- अर्ज छाननी : 2 जून 2026
- अर्ज माघार : 4 जून 2026
- मतदान : 18 जून 2026
- मतमोजणी : 22 जून 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे या 17 जागा गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे यंदाची विधान परिषद निवडणूक राज्यातील राजकीय समीकरणांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.





