हडपसरमधून महायुतीचे उमेदवार चेतन तुपे विजयी होणार; नाना भानगिरे यांनी व्यक्त केला विश्वास

हडपसर : राज्यात महायुतीचं सरकार आणणं आणि राज्याचा विकास करणं, सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवणं हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच ध्येय आहे.पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. हडपसर मतदार संघातूनही महायुतीचे उमेदवार चेतन तुपे हेच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी व्यक्त केला आहे.
महायुतीचे उमेदवार आमदार चेतन तुपे यांनी आज महंमदवाडी, कृष्णा नगर, हेवन पार्क ते श्रीराम चौक या भागांमध्ये शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या समवेत पदयात्रा केली. या सर्व भागात प्रचारादरम्यान उत्स्फूर्तपणे महिलांनी उमेदवार चेतन तुपे यांचे औक्षण करून त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला आहे.त्यावेळी भानगिरे बोलत होते.
शहर प्रमुख नाना भानगिरे,माजी नगरसेवक फारुखभाई इनामदार, अभिमन्यू भानगिरे कलेश्वर घुले,अभिजीत बोराटे ,अमर घुले पंकज कोद्रे, मनोज घुले, सुरेश घुले ,सचिन तरवडे ,करण भानगिरे,अंकुश घुले, गोरख घुले,आकाश भानगिरे, सचिन भानगिरे संदीप अल्हाट, संतोष रजपूत ,संतोष जाधव ,सौरभ खेडेकर ,खन्नासिंग कल्याणी,शितल गाडे , निकिता भंडारी ,स्मिता साबळे ,आशा यादव ,प्रतिमा बोबडे,आशा कांबळे,अर्चना सूर्यवंशी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.
हडपसरमध्ये महायुती जिंकणार : नाना भानगिरे
हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीत शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तर आमदार चेतन तुपे यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या तसेच आमदार योगेश टिळेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकास साधला आहे. त्यामुळे चेतन तुपे हे निश्चित निवडून येणार आहे.
प्रमोदनाना भानगिरे
शहरप्रमुख , शिवसेना





